डेबूजी युथ ब्रिगेडची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात भेट

0

मा.जिल्हाधिकाऱ्यांना दिले राष्ट्रीय जयंतीचे निमंत्रण आज दि.०७.०२.२०२० रोज शुक्रवार ला डेबूजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र च्या अमरावती जिल्हा कार्यकारी ने अमरावती चे मा.जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना २३ फेब्रुवारी २०२० रोजी शेंडगाव येथे होणाऱ्या संत गाडगे बाबा यांच्या भव्य राष्ट्रीय जयंती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले. यावेळी शेंडगाव या बाबांच्या जन्मगावाचा विकास लवकरात लवकर मार्गी लावावा असे निवेदन देण्यात आले. धोबी समाज आरक्षण मुद्यावर मा.जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा कण्यात आली. यावेळी डेबूजी युथ ब्रिगेड चे महाराष्ट्र संघटक तथा संत गाडगे बाबा यांचे नातू मा.नितीन जी जानोरकर, अमरावती चे नवनिर्वाचित जिल्हा मार्गदर्शक मा.विनोद जी माहुलकार,जिल्हाध्यक्ष मा.सतीश भाऊ सांबसकर,जिल्हा उपाध्यक्ष मा.अनंता भाऊ जानोरकर, सोशल मीडिया प्रमुख मा.मयूर भाऊ सवाईकर,तालुका अध्यक्ष अंजनगाव मा.पंकज भाऊ ठाकरे, तालुका संघटक मा.राजेश भाऊ शेवाने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply