डेबूजी युथ ब्रिगेड च्या सर्व सभा रद्द

मा.राहुल वरणकार साहेब त्यांचा महत्वपूर्ण निर्णय

0

दर्यापूर:-

सध्या सर्वत्र कोरोना नावाचे संकट जगासमोर येऊन ठेपले आहे त्याच पार्श्वभूमीवर डेबुजी युथ ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष मा.राहुलभाऊ वरणकार यांच्या आदेशानुसार डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचे सर्व कार्यक्रम व नियोजन बैठका 5 एप्रिल पर्यंत स्थगिती करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना राहुल वरणकार साहेब म्हणाले ” कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. कार्यक्रम,बैठक या मुळे गर्दी होत असल्याने संसर्ग होण्याचा जास्त धोका होऊ शकतो त्यामुळे 5 एप्रिल पर्यंत सर्व कार्यक्रम व बैठक रद्द करण्यात येत आहेत.” पुढे बोलतांना ते म्हणाले “या रोगावर नियंत्रण करायचे असेल तर राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या मंत्राचा अवलंब करून कोरोना सारख्या रोगावर सहज नियंत्रन मिळवता येईल” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.